LATEST NEWS

मुंबई, दि. 3 : आदिवासी समाजाची वज्रमूठ उभारत ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांतीचे नेतृत्व करणारे जननायक म्हणजे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा! त्यांचा शौर्यशाली वारसा जपण्यासाठी मोदी सरकारने १५ नोव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.

यासंदर्भात भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने 3 नोव्हेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात ‘जनजातीय गौरव दिन कार्यशाळा’ संपन्न झाली. यावेळी भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकही संपन्न झाली.

याप्रसंगी अनुसुचित जनजाती प्रदेश अध्यक्ष देवराव होळी, प्रदेश सहसंघटनमंत्री सतीश धोंड, खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, आमदार संजय पुराम, आमदार राजेश पाडवी, माजी खासदार हिनाताई गावीत, संतोष जनाटे, विरेंद्र शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा