मुंबई, दि. 9 : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी उरण येथील सीमा अनंत घरत यांची नियुक्ती झाली असून, त्यांच्या नियुक्तीबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

उरण परिसरात सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सीमा घरत यांना पक्षाने दिलेल्या या जबाबदारीमुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होण्यास मदत होणार आहे. पक्षाची विचारधारा तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यांसोबतच महिलांना संघटनेशी जोडण्यासाठी सीमा घरत या प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, उत्तर रायगड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष चंद्रकांत घरत, ‘उरण’चे उपनगराध्यक्ष रवी भोईर, उरण तालुका सचिव सुनील पाटील, महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, सचिव शमिता ठाकूर, आर्चीत घरत, भगवान घरत, उरण तालुका चिटणीस बळीराम घरत, जासई गाव अध्यक्ष सुनील घरत, दत्तात्रेय ठाकूर आदी मान्यवरांनीही सीमा घरत यांचे अभिनंदन केले.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा