LATEST NEWS

 

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन; ६७ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नवापूर (नंदुरबार), दि. 5 :  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने नवापूर येथील अग्रवाल भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिक व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात तब्बल ६७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक सेवेचा आदर्श निर्माण केला.

शिबिराच्या प्रारंभी भारतमाता, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. संकलित करण्यात आलेले रक्त सेवा ब्लड सेंटर, नंदुरबार येथे पाठविण्यात येणार आहे.
यावेळी भाजप विधानसभा प्रमुख अजय वसावे, अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस एजाज शेख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य जाकीर पठाण, जिल्हा महामंत्री सत्यानंद गावीत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य जयंतीभाई अग्रवाल, माजी नगरसेवक विशाल सांगळे, शहराध्यक्ष सागर पाटील, कुश गावीत, जोहूर पठाण, सज्जाद बदुडा, सौ. दुर्गा वसावे, वेलजी वसावे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सोशल मीडिया निलेश प्रजापत, तसेच कमलेश मीना,पंकज हिंगू,जगदीश जयस्वाल, मितेश पाटील, कृणाल दुसाने, संदिप पाटील, विशाल पाटील, अबरार शेख, जहांगीर खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी भाजपा कार्यकर्ते पंकज हिंगु यांनी 55 वेळा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याने अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश महामंत्री एजाजभाऊ शेख यांनी पंकज हिंगु यांचे समाजाप्रती असलेल्या जागरूकतेचे कौतुक केले.

रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

यावेळी अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश महामंत्री एजाज शेख यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे, प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज असलेले तसेच विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी रक्ताची आवश्यकता असते. रक्ताची गरज निर्माण झाल्यानंतर त्याची किंमत लक्षात येते; मात्र नियमित रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेत मदत उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक निरोगी नागरिकाने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

भाजपा विधानसभा प्रमुख अजय वसावे यांनी मनोगत व्यक्त करत रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमांमधून समाजसेवेची भावना अधिक बळकट होत असल्याचे सांगितले. वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छा न देता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संदेश या रक्तदान शिबिरातून देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाकीर पठाण यांनी केले, तर आभार एजाजभाऊ शेख यांनी मानले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रक्तदात्यांनी सहकार्य केले.

६७ रक्तदात्यांचा सहभाग आणि गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम यामुळे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हे रक्तदान शिबिर सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम ठरले.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा