जालना, दि. 8 : सेवा संकल्प अभियानाच्या अंतर्गत विश्वगौरव, यशस्वी पंतप्रधान तथा भारताचे लोकप्रिय नेतृत्व माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या राष्ट्रसेवेच्या २५ वर्षांच्या अविरत सेवा, समर्पण व राष्ट्रनिर्माणाच्या प्रवासानिमित्त आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला बळ देण्यासाठी ‘हर घर स्वदेशी, घर घर स्वदेशी’ हा सामूहिक संकल्प घेण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर करणे, स्थानिक उत्पादने व स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत आपला सक्रिय सहभाग नोंदवणे, याबाबत जनजागृती केली.
यावेळी कार्यकर्त्यांनी हर घर संपर्क अभियान राबवत नागरिकांच्या घरोघरी जाऊन स्वदेशीचा संदेश दिला आणि ‘हर घर स्वदेशी, घर घर स्वदेशी’ या संकल्पनेशी नागरिकांना जोडले. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने प्रत्येक कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा असून, स्वदेशीचा स्वीकार ही राष्ट्रनिर्माणातील प्रभावी लोकचळवळ ठरावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.
या उपक्रमास श्री. गणेश गिरी, डॉ. स्वप्नील बी. मंत्री मुख्य प्रदेश प्रवक्ते तथा मुख्य प्रदेश समन्वयक भाजपा वैद्यकीय प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश, डॉ. प्रफुल्ल गट्टानी, रवि मूंदड़ा, मुकेश केजडीवाल, तुकाराम पवार, पूनम पारडे, ज्योती भालेकर, मनोज काळे, रघुनाथ म्हस्के, गोटू शर्मा, प्रल्हाद जाधव, केशव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘स्वदेशी स्वीकारूया, आत्मनिर्भर भारत घडवूया’ या निर्धाराने अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
































































