मुंबई, दि. 18 : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्राच्या सोशल मीडिया प्रकोष्ठाच्या संयोजकपदी प्रकाश गाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निखिल लाटकर यांची सोशल मीडिया प्रकोष्ठाच्या सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने १७ सप्टेंबर रोजी याबाबतचे नियुक्तीपत्र जारी करण्यात आले.








































