भाजप राज्य परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्या नेतृत्वाखाली दीपोत्सव; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अहिल्यानगर, दि. 19 : देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पारनेर तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाजप परिषद सदस्य विश्वनाथ दादा कोरडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यात “आशीर्वादाचा दिवा” हा नाविन्यपूर्ण उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
तालुक्यातील विविध गावांमधील मंदिरे, सार्वजनिक चौक आणि घरांसमोर नागरिकांनी दिवे लावून पंतप्रधान मोदींना उदंड आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाची सुरुवात वडझिरे येथे करण्यात आली. या वेळी मा.श्री. विश्वनाथ दादा कोरडे यांच्या हस्ते पहिला ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला. त्यानंतर तालुक्यातील देवीभोयरे, जवळा, कान्हुर पठार, पानोली, पुणेवाडी, पारनेर, सुपा, टाकळी ढोकेश्वर, भाळवणी, निघोज, अळकुटी यांसह इतर गावांमध्ये भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले. “भारत माता की जय” आणि “नरेंद्र मोदीजी आगे बढो” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
या प्रसंगी बोलताना श्री. विश्वनाथ कोरडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी गेल्या बारा वर्षांत भारताला जागतिक पातळीवर एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. देशातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत. त्यांच्या या अलौकिक नेतृत्वाला आणि सेवाकार्याला पाठबळ देण्यासाठी, तसेच त्यांना उदंड आयुष्य लाभावे या प्रार्थनेने आम्ही पारनेर तालुक्यात ‘आशीर्वादाचा दिवा’ हा उपक्रम राबवला आहे.
तालुक्यातील सर्वच भागांतून या उपक्रमाला नागरिकांचा, विशेषतः महिला व युवकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सायंकाळच्या सुमारास दिव्यांच्या लखलखाटाने संपूर्ण पारनेर तालुका उजळून निघाला होता.
या कार्यक्रमास मा.जि.प.सदस्य श्री.राजाराम एरंडे, सुभाष सुरुडे, सोपान करकंडे, सरपंच पंकजदादा कारखिले, उपसरपंच विकासराव सावंत, कमलाकर बेलोटे, विश्वनाथ बेलोटे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस पै. जयदीप सालके पाटील, संदीप सालके पाटील, अर्जुनराव नवले, कानिफनाथ ठुबे, संदीप ठुबे, गोकुळ ठुबे, कृष्णाजी बडवे काका, नवनाथ सालके, कैलास बरशीले, अमोल गायकवाड, संभाजी मोरे, शुभम निघूट, डॉ. सुरेश खणकर, गणेश बेलोटे, सचिन सालके, वरद बडवे, यांसह भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत पंतप्रधान मोदीजींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आणि हा अनोखा दीपोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला.












































