LATEST NEWS

 

भाजपा प्रदेश मुख्य प्रदेश नवनाथ बन यांनी डागली संजय राऊतांवर तोफ

मुंबई, दि. 2 : दिल्ली येथे इंडिया आघाडीने काढलेल्या वरातीत नाचण्यासाठी गेलेल्या उबाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांना साधे भाषण करण्याची संधीही देण्यात आली नाही. राहुल गांधी यांचे महाराष्ट्राबद्दलचे धोरण सातत्याने दुजाभावाचे राहिले आहे. कालच्या या रॅलीमध्येही महाराष्ट्राबद्दलचा हा आकस दिसून आला. अशा राहुल गांधींची गुलामी आणि चाकरी उबाठा गट किती वर्षे करणार आहे, असा सवाल भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी उपस्थित केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राहुल गांधींच्या रॅलीची अनेक दिवसांपासून तयारी सुरू होती. रामलीला मैदानाची क्षमता 50 हजारांच्या आसपास असताना 20 पक्षांना मिळून 22 हजार लोकही जमवता आले नाहीत, हे त्यांचे दुर्दैव आहे. त्यामुळे कालची रॅली पूर्णपणे फ्लॉप झाली. ही तुमची क्षमता आणि तुमची शक्ती आहे. संजय राऊत, तुम्ही भिंगाचा चष्मा घालून गर्दी जर 10 ते 15 लाख वाटत असेल, तर तुम्हाला मनापासून शुभेच्छा. त्यामुळे एआय जनरेटेड फोटो टाकून रॅलीत गर्दी दाखवण्याचा दुर्दैवी प्रयत्न काँग्रेस नेत्यांनी केला. अशा फोटोच्या माध्यमातून बनावट गर्दी दाखवता येईल, परंतु जनतेच्या हृदयात तुम्हाला स्थान निर्माण करता येणार नाही, असे श्री. बन यांनी निक्षून सांगितले.

श्री. बन पुढे म्हणाले, राहुल गांधी यांच्या माध्यमातून राबवल्या जात असलेल्या भेदतंत्राला उत्तर म्हणून लोकशाहीच्या मार्गाने आम्ही विरोध करत आहोत. भाजपाची रॅली ही लोकशाही वाचवण्यासाठी आहे. काल ठाण्यात माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणजी, भूपेंद्रजी यादव यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली निघाली. या रॅलीचा एकच उद्देश आहे की, तुम्ही जे दाखवत आहात ते चुकीचे आहे. तुमचे भेदतंत्र असेल तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने तुमचा विरोध करत राहू. आम्हाला तुमच्यासारखी देशात अराजकता पसरवायची नाही, तुमच्यासारखी बांगलादेश आणि नेपाळसारखी परिस्थिती देशात निर्माण होऊ द्यायची नाही. आम्हाला तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर द्यावे लागेल.

ज्या सरकारचे गृहमंत्री आणि संजय राऊत तुरुंगात होते, त्यांनी मोदीजींवर न बोललेलेच बरे, असे सांगून श्री. बन म्हणाले, संजय राऊत, तुम्ही स्वत: जामिनावर बाहेर आहात आणि राहुल गांधीही नॅशनल हेराल्ड प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत. जेव्हा जेव्हा नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सुनावणी असते, त्याच्या आदल्या दिवशी राहुल गांधी मोर्चा काढतात. याआधीही मोर्चा झाला होता तेव्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सुनावणी होती. आजही नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सुनावणी आहे आणि काल राहुल गांधींनी मोर्चा काढला. मोदीजींना तुरुंगात टाकण्याची धमक तुमच्यात नाही. कारण मोदीजींनी स्वतःचे घर बांधण्यासाठी भ्रष्टाचार केला नाही. मोदीजींनी पत्राचाळीत घोटाळा केला नाही. मोदीजींनी बीडीडी चाळीतील घरांच्या किमती वाढवलेल्या नाहीत. मोदीजींनी 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिलेले नाही.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा